अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढु बुद्रुक (ता शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण गाव बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला आहे,
स्वराज्याची दुसरी पंढरी समजली जाणाऱ्या धर्मपीठ, शक्तिपीठ, प्रेरणापीठ, बलिदान पीठ श्रीक्षेत्र वढु बुद्रुक गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर नुकतीच बैठक घेऊन नेत्यांसाठी गाव प्रवेश बंदी करण्यात आली होती, त्यानंतर कुठल्याच लोकनेत्याला ग्रामस्थांनी गावात प्रवेश करून दिला नाही, आज जरांगे यांची प्रकृती नाजूक झालेली पाहता गावामध्ये आंदोलन अतिशय तीव्र करण्यात आले,