मराठा समाजाला आरक्षण, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी दरेकरवाडीत कॅन्डल मोर्चा

Bharari News
1 minute read
0
सुनील भंडारे पाटील
                संपूर्ण देशभर गाजत असलेला मुद्दा मराठा आरक्षण या महत्त्वाच्या मराठा समाजाच्या मागणीसाठीची धग आता संपूर्ण  राज्यभरात शहरे तसेच खेडोपाडी पोहोचली असून दरेकरवाडी (तालुका शिरूर) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावात कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,
                वास्तविकता आजतोवर राज्य शासनाने या मुद्द्यावर तोडगा काढणे गरजेचे होते, परंतु निर्णय घ्यायला विलंब लागत असल्याने मराठा समाजाची नाराजी वाढत चालली आहे, आंदोलन अजून तीव्र होऊ लागले आहे, जरांगे पाटील यांची मागणी रास्त असून राज्य शासन वेळ काढू पणा करत आहे,                  आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्या अशा स्वरूपाचे मागण्या करत सणसवाडी मध्ये कॅन्डल मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते, हा कॅन्डल मोर्चा सभामंडप दरेकरवाडी ते गणेश मंदिर माळवाडी ते हनुमान मंदिर दरेकरवाडी असा काढण्यात आला होता, या मोर्चामध्ये सकल मराठा समाज दरेकरवाडी मधील मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला सहभागी झाले होते,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 25, June 2025