सारथी व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल), पुणे यांचा मदतीने कौशल्य विकासबरोबर माहिती-तंत्रज्ञान महत्त्वाचे
एमकेसीएल पुणे विभागाचे डेप्युटी जनरल मॅनजर डॉ दीपक पाटेकर यांचे मार्गदर्शन
सारथी व एम के सी एल तर्फे मराठा व कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना कोरेगाव भीमा येथे मोफत संगणक प्रशिक्षण
सुनील भंडारे पाटील
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी ) पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ( एमकेसीएल) पुणे यांच्या द्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास मोफत प्रशिक्षणाला नुकतीच कोरेगाव भीमा येथील पूर्तता कॉम्पुटर एज्युकेशन मध्ये सुरुवात झाली.
सदर प्रशिक्षण सहा महिन्यांचे असून मराठा व कुणबी मराठा समाजातील १८ ते ४५ वयोगटातील युवक युवतींसाठी आहे. एम के सी एल पुणे विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर डॉ .दीपक पाटेकर तसेच पुणे रिजनल मॅनेजर राहुल बारस्कर पुणे रिजनल लीड सेंटर चे विश्वजीत उत्तरवार, यांच्या मार्गदर्शना खाली सदर प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच पुणे लोकल लीड सेंटर चे समन्वयक अमित खापरे यांनी सादर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सारथी संस्थेच्या वतीने सरकारच्या माध्यमातून मराठा व कुणबी समाजाच्या युवकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात,
स्वयंरोजगार क्षमता वाढविणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विशिष्ट कौशल्ये आणि सॉफ्ट स्किलस यावर प्रभुत्व मिळवून स्थानिक आणि जागतिक डिजिटल अर्र्थव्यवस्थेतील संधीसाठी तरुणांना विकसित केले जाणार आहे या अभ्यासक्रमात प्रत्येकी १२० तासाचे ४ MODULE असतील. सहा महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम मोफत पूर्ण करावयाचा आहे, आगामी काळात त्याचा चांगले फायदा प्रशिक्षण पूर्ण करण्याऱ्या युवक युवतींना होणार आहे, कोरेगाव भीमा येथील पूर्तता कॉम्पुटर चे संचालक नवनाथ सावंत यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींनी संस्थेत येऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.