श्री संत निळोबाराय महाराज पायी दिंडी पालखी सोहळा

Bharari News
0

 सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले

         चिंचोली मोराची येथील पायी दिंडीचे श्री संत निळोबाराय महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्यात सामील होणेसाठी मोठ्या उत्साहात . वाद्याचे गजरात प्रस्थान झाले ,
     

यावर्षी निळोबाराय दिंडीचे रथास बैलजोडीचा मान चिंचोली गावाचे दिंडीस मिळालेने वारकऱ्यांत मोठा उत्साह होता . या दिंडी सोहळ्याचे वैशिष्ठ्य म्हणजे गायक वादक भजने सर्व गावचे असतात . हभप अंबर्षी महाराज यांनी सर्व गावकर्यांस दहा वर्षापासून भजन गायन शिकविले पासून गावात अध्यात्म परमार्थाची आवड निर्माण झाली आहे . 
      

नाहीतर काही मोठ्यां गावांनी दिंडी खूप मोठी निघते पण गाणारे वाजवणारे आळंदीहून भाड्याने मागवावे लागतात . आज पिंपळनेर येथून प्रस्थान होवून राळेगण सिद्धी येथे मुक्काम आहे . त्यानंतर देवदैठण, बेलवंडी, श्रीगोंदा, टाकळी -सिद्धटेक, भांबुरा , स्वामी चिंचोली, लोणी देवकर, सरडेवाडी - इंदापुर , टेंभुरणी , परिते, करकंब , भोसे - करकंब , गुरसाळे असे मुक्काम दर मुक्काम करत दि. ८ जुलै रोजी चंद्रभागेतिरी पंढरपुर येथे पोहचेल . रोज प्रवचन भजनकिर्तन असे नियोजन असते . गोल रिंगन व उभे रिंगण बेलवंडी , भांबुरा, टेंभुर्णी व करकंब येथे होणार असून दोन वर्षे दिंडी सोहळा बंद असल्यामुळे भावीक वारकर्यांना सतसंग परमार्थानंदाची मोठी पर्वणी आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!