सुनील भंडारे पाटील
पुणे वाघोलीतील सोसायटीमध्ये पाणी वाघोली झिलों का शहर अशा आशयाची बातमी भरारी न्यूज ने सर्व सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती, याची दखल घेऊन आमदार कटके यांनी तातडीने पावले उचलली,
घोलीतील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबत शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी रविवारी (दि.१५) सकाळी आयव्ही इस्टेट परिसरात पाणी साचणाऱ्या भागांमध्ये नागरिक, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून लवकरात लवकर ड्रेनेज लाईनची कामे सुरु करण्यासाठी खडसावले.
गुलमोहर प्राईम, आयव्ही म्हसोबा मंदिर, काळेवाडा, लोहगाव रोड, फुलमळा परिसर अशा ठिकाणी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत गंभीरतेने घेण्यात आले आहे.
म्हसोबा मंदिर परिसरात पूर्वीच लेव्हल सर्वेक्षण झाले होते. या ठिकाणी तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. गुलमोहर प्राईम, आयव्ही म्हसोबा मंदिर, काळेओढा, लोहगाव रोड, फुलमळा परिसर अशा ठिकाणी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत आयव्ही इस्टेट ते केसनंद रोडदरम्यान ड्रेनेज लाईनचे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, संदीप (आप्पा) जाधव, अनिल सातव पाटील, महेंद्र भाडळे, संतोष हरगुडे, बापू हरगुडे, शिवदास पवार, गणेश गोगावले, सागर गोरे, गुलमोहर सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद वारघडे, संदीप शिंदे, सोसायटीचे सचिन माळी, प्रसाद केळकर, आनंद पंडित, भूषण बोराडे यांचेसह मनपा वार्ड ऑफिसर वाकडे, विनायक शिंदे, उप अभियंता सागडे व नागरीक आदी उपस्थित होते.