एक एस एम एस ,,,,, आमदार पवारांनी ट्रांसफार्मर बदलला,

Bharari News
0

 सुनील भंडारे पाटील 

       वढू बुद्रुक (ता शिरूर ) येथील राणोवाडी वस्तीवरील ट्रांसफार्मर जळाला होता, त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांना फक्त एक एस एम एस टाकला, आणि आश्चर्य दोन दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला,
 संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असून  रहदारी देखील दाट आहे, महत्वाचे म्हणजे या परिसरात अनेक वर्षांपासून लहान-मोठ्या बिबट्यांचे वास्तव्य असल्यामुळे रात्रीच्या काळोखात त्यापासून असणारी भीती, अवलंबून असणारे मोठे बागायती क्षेत्र, वस्तीवरील दाट रहदारी, या सर्व गोष्टींचा विचार करता, महत्वाची विद्युत पुरवठा करणारे  रोहिित्र  जळालेने खूप अडचणी तयार झाल्या होत्या, स्थानिक शेतकरी  महादेव अण्णा भंडारे यांनी त्वरित आमदार पीए गिरमकर यांच्याशी चर्चा केली असता, पुढील मार्ग काढून आमदार पवार यांना फक्त एक एस एम एस टाकला आणि आश्चर्य म्हणजे कुठलीही बोलाचाली न होता दोन दिवसात
वरिष्ठ अभियंता एडके, कार्यकारी अभियंता महाजन, कनिष्ठ अभियंता बिराजदार यांनी तातडीने हालचाल करून ट्रान्सफॉर्मर बदलून दिला, आमदार पवार यांच्या शेतकऱ्या विषयी आपुलकी, जिव्हाळा बद्दल लोकांनी आभार मानले, यावेळी  सोमनाथ भंडारे, खंडू भंडारे, नवनाथ भंडारे, बाबासाहेब सावंत, अरुण  भंडारे,  व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!