पत्रकार के डी गव्हाणे यांचा वाढदिवस साजरा

Bharari News
0

सुनील भंडारे पाटील 

                  सामाजिक जबाबदारी संभाळून पत्रकारीता मधील विस्वाहर्ता के डी भाऊनी जपली असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकरकाका भुमकर यांनी केले.
               

  लोणीकंद (ता.हवेली) येथे सुयश दिनदर्शिकाचे संपादक , मराठी पत्रकार समितीचे जिल्हा अध्यक्ष, पत्रकार के. डी. गव्हाणे यांच्या वाढदिवसाला झालेल्या सत्कार समारंभात भुमकर बोलत होते.
              जेष्ठ नेते श्रीमंत झुरुंगे अध्यक्ष स्थानी होते.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष शरद पाबळे, पत्रकार सुनिल भांडवलकर, कोरेगाव भिमा विविध विकास सोसायटीचे चेअरमन बबुशा ढेरंगे,  सरपंच संजय काशिद, रविंद्र कंद, बाळासाहेब ढगे, पांडुरंग आरगडे, शाहिर प्रकाश गोसावी, ईश्वर शिंदे, सुधिर कंद, आदी उपस्थित होते भुमकर पुढे म्हणाले के. डी. गव्हाणे यांनी पत्रकारीतेचा व्यासग जपला. बातमीचा काय परिणाम होइल याचा विचार करुन समाजाचे माणसाचे गावचे हित जपले. शेतकरि कामगार याची कड घेऊन तब्बल तिस वर्ष पत्रकारीता करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने केला. या पद्धतीची एक आदर्श पत्रकारीता ठरली आहे. 
  
शरद पाबळे म्हणाले के. डी. भाऊनी पत्रकारीता मध्ये झोकून देऊन काम केले संध्या, प्रभात, राष्ट्रतेज, सामना, लोकसत्ता , लोकमत आदी वृतपत्रात काम केले प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटला . यावर ते थांबले नाहीतर विद्यार्थी जडण घडण साठी सुयश विद्यार्थी दिनदर्शिका उपक्रम सुरु करुन २५ वर्ष राबविला त्याच्या या कार्याची दखल घेऊन सामाजिक संस्था , मंडळ, संघटना , तसेच राज्य शासन , केंद्र शासनाचे असे १३७ पुरस्कार प्रधान करुन सन्मानित केले आहे.त्यांना वाढदिवसाला हार्दीक शुभेच्छा
बाळासाहेब ढगे यांनी सुत्रसंचालन तर सुधिर कंद यांनी  आभार मानले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!