सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
वनवासामध्ये राम मृगाचे मागे गेला व पाठोपाठ लक्ष्मणही जाताना कुटीबाहेर संरक्षणार्थ एक रेषा आखून गेला . सितेने ती दानधर्म करणेसाठी अनावधानाने ओलांडली , तसं रावणाने स्वरूप धारण करून उचलली व लंकेत अशोकवनात नेवून बसवली . हरणाचे चोळी मोहाने व लक्ष्मणरेखा सितेने ओलांडलेने रामायण घडले, म्हणून मुलींनी आयुष्यात लक्ष्मणरेखा ओलांडायची नसते , असे प्रतिपादन भैरवनाथ माध्यमिक विद्यालय शिक्रापुर येथे योगदिना निमित सकाळी आयोजीत व्याखानात केले .
कोणत्याही लोभाला, मोहाला , प्रलोभनाला बळी पडून कोणी चाँकलेटच्या अमिषाने, कुणी मोबाईल गिफ्ट घेवून फसल्या जातात व बरबाद होतात . रामायणातून मानवाला अनेक संदेशाद्वारे जागृत केले आहे असेही त्यांनी दिड तासाच्या उदबोधनात सांगितले . त्यानंतर जिजामाता इंग्लीश मेडीयम स्कूल सणसवाडी , जि . प . शाळा वढू व आपटी अशा चार शाळांनी व्याखाना द्वारे मुलांना उमेद वाढवत यशस्वी होण्यासाठी त्यांचेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणेसाठी अनेक उदाहरणे देत प्रबोधन केले . प्राचार्य गणेश खेडकर , ' जिजामाताच्या प्राचार्या शानबाग , वढू व आपटीचे मुख्याध्यापक व मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ देवून मिडगुले यांचा सत्कार करणेत आला .