सासवड बापू मुळीक
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सासवड (तालुका पुरंदर) या विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि विद्यालयाचा ३१ वर्धापन दिन उत्साहात तसेच जल्लोषात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय आनंदी काकी जगताप लाभल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच भारत मातेच्या आरतीने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंग मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीत तसेच समूह नृत्याचे सादरीकरण केले. तसेच विविधतेतून एकात्मतेचा संदेश देणारी नाटिका देखील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सादर केली. आदरणीय आनंदी काकी जगताप यांनी विद्यार्थ्यांना देशाचे सुजाण नागरिक घडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंग मॅडम, उपप्राचार्या रासकर मॅडम ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख उज्वला जगताप मॅडम ,प्री -प्रायमरी विभागप्रमुख स्वाती जगताप मॅडम विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत यांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्ररेखा केसकर मॅडम व शितल बोरुडे मॅडम यांनी केले.स्वाती भारती मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले,