शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामू आण्णा घोडे यांच्या सहकार्याने दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान शिरूर बेट भाग व पंचशील फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे टाकळी हाजी येथे शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे उद्घाटन करण्यात आले .
बेट भागात इतक्या मोठ्या प्रमाणात असे भव्य आरोग्य शिबिर पहिल्यांदाच राबविले गेले असून ' जिथे कमी तिथे आम्ही' या दामू अण्णा यांच्या ब्रीद वाक्यानुसार साजेसे काम प्रतिष्ठानने केल्याचे प्रतिपादन निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी केले.
यावेळी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे,चेअरमन बन्सीशेठ घोडे, निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या व टाकळी हाजी च्या सरपंच अरुणाताई घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, माळवाडी चे सरपंच सोमनाथ भाकरे,निमगाव दुडे चे माजी सरपंच दिपक दुडे,टाकळी हाजी चे ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, अर्जुन खामकर, बाळासाहेब जाधव, भरत खामकर,विलास साबळे, मनिषा घोडे, पंढरी उचाळे ग्रामसेवक राजेंद्र खराडे, साबळेवाडी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल आप्पा साबळे,भाऊसाहेब महाराज चोरे , दगडू भाई हवालदार, सोनबा खाडे, माजी पोलीस पाटील कुंडलिक जाधव ,पारभाऊ गावडे ,अर्जुन घोडे ,रोहिदास घोडे ,अशोक गावडे, सावकार घोडे अहमदभाई हवालदार, अशोक काळे बबन साबळे, पोपट बाबुराव घोडे ,पोपटराव उचाळे , पोपट घोडे ,भानुदास कांदळकर ,अमोल रसाळ, राहुल काने, बन्सी साळवे, दिपक साबळे ,अंकुश उचाळे ,माऊली पवळे, सचिन खामकर, विजय खामकर, गणेश बोखारे , शिवाजी चासकर , रामभाऊ गावडे, विलास किठे, विठ्ठल किठे , राहुल रसाळ, बबन बिबवे, संतोष चोरे, श्रीपती उचाळे , बबन घोडे, वजीर भाई ,भागा भाईक ,संतोष घोडे ,दत्तात्रय पवार, दादाभाऊ घोडे ,अशोक शिंदे, म्हातारबा खाडे, शंकर मुसळे ,रामदास नायकोडी, विनोद बोखारे, रामदास खोमणे, रामा घोडे ,पुरुषोत्तम चोरे ,कांताराम चोरे ,राजू शिंगाडे ,संपत घोडे ,बाबाजी गावडे, सागर घोडे, समालोचक लहू साबळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष घोडे, अशोक मेचे, नारायण कांदळकर, भाऊ उचाळे, सावकार घोडे, अमोल रसाळ, मारुती नरवडे, गणेश भोसले, सुरेश बारहाते,शेखर घोडे, बाबाजी उचाळे, गणेश घोडे, बाबाजी सोदक, पुरुषोत्तम चोरे, कांताराम चोरे, दत्ता साळवे,विक्रम घोडे, बाळासाहेब खटाटे, बाळासाहेब टेमकर, संजय निकम, गणेश कसबे, रामदास खटाटे , बाबाजी बाराहाते, अविनाश उचाळे, सुरेश गावडे, हरिनाना सोदक, तुकाराम घोडे बाजीराव चाटे, रामदास कांदळकर, फक्कड भाकरे ,संजय टेमकर किसन मेरगळ, बाबाजी उचाळे ,सुरेश साबळे माऊली नगरे, मयूर मंदिलकर , मारुती महाराज पोटे ,मारुती गावडे पोस्टमन , राहुल साबळे ,नागेश चोरे ,कोंडीभाऊ खामकर, सबाजी गोरडे गुरुजी, किरण गाडगे व टाकळी हाजी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराची सुरुवात मंगळवारी( दि.२०) मलठण येथून झाली असून बुधवारी जांबुत,गुरुवारी कवठे येमाई , शुक्रवारी पिंपरखेड येथेही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
पंचशील फाऊंडेशन चे डॉक्टर धनंजय धस, शुभम घोडे, ऋषी कवडे,जाफर शेख,शुभम खटाटे,निखिल देवकर, संकेत घोलप ,अथर्व गायकवाड ,सुरेश उचाळे, किशोर कवडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.याबद्दल टाकळी हाजी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
सदर शिबिर मंगळवार दिनांक २०/०९/२०२२ ते शनिवार दिनांक २४/०९/२०२२ सकाळी ९.०० ते सायं. ४.०० या वेळेत मलठण,जांबुत, कवठे येमाई,पिंपरखेड, टाकळी हाजी या गावांमध्ये राबविले गेले. सुमारे दोन हजार लोकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष घोडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन साबळेवाडी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल आप्पा साबळे, सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे व आभार माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश उचाळे यांनी मानले.
सदर शिबिरात मोफत ....
* डोळे तपासणी व डोळ्यांचे ड्रॉप वाटप
* बी पी व शुगर तपासणी
* डोकेदुखी,अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला,त्वचेचे
आजार,पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व
आजारांवर मोफत औषधे वाटप
* डोळ्यांसाठी नंबर लागल्यास एक हजार रुपयांचा चष्मा फक्त १५०ते २०० रुपयात उपलब्ध करून देण्यात आला होता.
खराब हवामानामुळे आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे , यामुळे 'एक पाऊल आरोग्याकडे' म्हणून हा उपक्रम राबवला असल्याचे दामू आण्णा घोडे यांनी सांगितले.