शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेतील गणेश मच्छिंद्र मांढरे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भोर येथे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी व महिला शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात गणेश मांढरे यांना आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष जी.के.थोरात, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त अनिल गुंजाळ, शिक्षक संघाचे राज्याचे विश्वस्त के. एस. ढोमसे, राज्य प्रतिनिधी धर्मेंद्र देशमुख, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, सोमनाथ भंडारे, अशोकराव दरेकर तसेच तालुक्यातील विविध शाळांमधील प्राचार्य व शिक्षक वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की शाळा व शिक्षकांचे प्रश्नाबाबत सरकार उदासिन आहे. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. जि. प. सदस्या कुसुमताई मांढरे, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव प्राचार्य नंदकुमार निकम, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे यांनी मांढरे यांचे अभिनंदन केले आहे.