गुजर प्रशालेत शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त महाभोंडल्याचे आयोजन

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत मंगळवार शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.       
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील गुजर प्रशालेत आयोजित या कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच प्रशालेतील महिला शिक्षिका यांच्या हस्ते भोंडल्यानिमित्त हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या उपशिक्षिका सुमन जंगम यांनी नवरात्रोत्सवानिमित्त विद्यार्थिनींना आपण भोंडला का साजरा करायचा तसेच शारदीय नवरात्रोत्सव हा हस्त नक्षत्रावर येत असल्यामुळे आपण हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करतो ते का करावयाचे असते याची सखोल माहिती विद्यार्थिनींना दिली. त्याचप्रमाणे पारंपारिक परंतु लोप पावत चाललेली भोंडल्याची गाणी यांचे गायनही यावेळी प्रशालेत करण्यात आले. प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी दांडिया व गरबा खेळून भोंडल्याचा समारोप केला. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींना भोंडल्यानिमित्त खिरापत व विविध प्रकारच्या प्रसादाच्या वाटपाचे आयोजनही करण्यात आले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!