भुजबळ विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, 
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात आयोजित या कार्यक्रमात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य बाळासाहेब चव्हाण म्हणाले की भारताचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या दोन्हीही महान नेत्याचे केलेले कार्य व त्यानी केलेला त्याग विसरता येणार नाही. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा देऊन शेतकरी बांधवासाठी फार मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळेच आज भारत देश सुजलाम सुफलाम झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्कृतिक विभाग प्रमुख शालन खेडकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!