लोणीकंद पोलिसांची दबंग कारवाई पेरणे फाटा मर्डरच्या गुन्ह्यात 2 वर्ष 3 महिने फरार आरोपी जेरबंद

Bharari News
0
पुणे प्रतिनिधी 
             अपहरण करून मर्डर करणाऱ्या गुन्ह्यात दोन वर्ष तीन महिन्यापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोणीकंद (तालुका हवेली) पोलीस स्टेशन ने कारवाई करत लोणीकंद सायबर तपास पथकाने आवळल्या मुसक्या,             
 याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार 2020 मधील पेरणे फाटा तालुका हवेली येथील गोविंद कुमकर   मर्डर प्रकरणातील गुन्ह्यातील फरार आरोपी सचिन बाळू वारघडे (राहणार ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे), याचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे, तपास पथक पोलीस प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, तसेच पोलीस अंमलदार समीर पिलाने, यांनी त्यांच्या खास खाबऱ्यांना आरोपीची माहिती देऊन, चाकण तसेच आळंदी भागात रवाना केले होते, खास खबर्‍याकडून माहिती मिळाली की, सदर आरोपी बहुळ तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आपले अस्तित्व लपून रहात आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार  यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोहवा बाळासाहेब सकाटे, पो अ समीर पिलाने, सचिन चव्हाण, मल्हारी सपोरे, यांनी खाजगी वाहनाने जाऊन माहितीची शहानिशा केली, सदर आरोपी वावरत असल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर सापळा लावून सदर आरोपीच्या वर्णनानुसार, माहितीनुसार त्याला अटक करण्यात आली,
             सदर ची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, यांच्या मार्गदर्शना खाली , तपास पथक प्रमुख सुरज गोरे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलिस अंमलदार समीर पिलाने, सचिन चव्हाण,मल्हारी सपुरे,सागर पाटील, महिला पोलीस अंमलदारकीर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण  यांनी केली
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!