अष्टविनायक थेऊर मार्गावर धोकादायक वळणांमुळे होत आहेत अपघात

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
           बकोरी (तालुका हवेली) येथील थेऊर ला जाणाऱ्या रस्त्यावर मगरवस्ती अष्टविनायक चौकात रोज होता आहेत अपघात. प्रशासनाचे मात्र दुरलक्ष आज पुन्हा एकदा एक ट्रक त्याठिकाणी पलटी झाला,               अष्टविनायक महामार्गा वर सार्वजनिक बांधकाम विभागाचे माध्यमातून संबंधित रस्त्याचे काम थेऊर फाटा ते लोणिकंद असे पुर्ण होत आहे, परंतु अनेक ठिकाणी वेडीवाकडी वळणे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे, हा मार्ग राज्यांमधील अष्टविनायक गणपती पैकी प्रसिद्ध अशा थेऊर चिंतामणी या देवस्थानाला जोडला आहे, आसपासची रहदारी, मोठ्या प्रमाणात शेती व उद्योग व्यवसाय तसेच पुणे सोलापूर महामार्ग, पुणे नगर महामार्ग ला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे,  
रस्त्यावर वाहनांची गर्दी असते, बेशिस्त वाहन चालक, वाहनांचा अतिवेग यामुळे अपघात घडत आहेत,अनेक वेळा पोलीस प्रशासन यांनी संबंधित ठेकेदार यांना त्याठिकाणी गतिरोधक बसवण्याची विनंती केली परंतु गतिरोधक बसवले जात नाही त्यामुळे रोजच अपघात होत आहेत,प्रशासनाने लवकरात लवकर गतिरोधक बसवले नाही तर त्याठिकाणी आता आंदोलन ऊपोशन करावे लागेल. असा इशारा नागरिकांनी दिला आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!