आज पुन्हा एकदा वाजेवाडी ग्रामस्थ स्वप्नपूर्ती कडे...

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
      जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील  यांनी वाजेवाडी गाव हे दत्तक घेतल्याची घोषणा केली त्याबद्दल वाजेवाडी (तालुका शिरूर) पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार ग्रामस्थांच्या वतीने मानण्यात आले,   
   यात्रेनिमित्त त्यांना निमंत्रण समयी असताना त्यांनी ही आनंदाची बातमी ग्रामस्थांना दिली. यापूर्वी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान खासदार गिरीशजी बापट यांनी गाव दत्तक घेतले होते यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी गाव दत्तक घेतले.बापट यांच्या माध्यमातून गावात आणि पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे करता आली. गावातील अनेक रस्ते त्या माध्यमातून झाले. आणि आता पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांनी गाव दत्तक घेतल्याने राहिलेल्या अपूर्ण कामांना गती मिळणार आहे. या बद्दल वाजेवाडी-मांजरेवाडी ग्रामस्थांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानले 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!