सणसवाडी येथील भैरवनाथ मंदिराचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनीधी
       सणसवाडी (तालुका शिरूर) येथील श्री कालभैरवनाथ मंदिराचा अकरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला . काल दिनांक २३ रोजी पहाटे श्रींची महापूजा सकाळी नऊ ते दोन गणपती पूजन ,पुण्यवाचन व होम हवन पुरोहित महेश सातभाई व सहकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले .     
 रात्री सात ते नऊ हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन व त्यानंतर श्री शिवाजीराव हरिभाऊ दरेकर यांच्यातर्फे उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन होते .रात्री दहा ते बारा श्री भैरवनाथ भजनी मंडळ व पांडुरंग भजनी मंडळ सनसवाडी यांचा भजनाचा हरिजागर झाला . आज दिनांक २४ पहाटे श्रींची पूजा व महाअभिषेक ,सकाळी दहा ते बारा श्री कालभैरवनाथाचे भराड ,दुपारी बारा ते दोन भजनाचा कार्यक्रम झाला .दुपारी तीन ते सहा सणसवाडी येथे वाद्याचे गजरात श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली .सायंकाळी सात ते नऊ संतचरणरज  बाळकृष्ण वसंतगडकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले .कीर्तनाचे आयोजन सौजन्य मा ग्रा सदस्य विश्वनाथ हरगुडे व शिवाजी बापूराव हरगुडे यांच्यातर्फे होते .   
महाप्रसाद माजी उपसभापती आनंदराव हरगुडे व माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर यांच्यातर्फे देण्यात आला . मंदिराची आकर्षक सजावट श्री दत्तात्रेय नामदेव हरगुडे उपसरपंच यांच्यातर्फे करण्यात आली . मंडप सौजन्य सरपंच संगीता हरगुडे व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सुदाम दरेकर आणि माजी ग्रामपंचायत सदस्य कुंदाताई हरगुडे यांच्यातर्फे होते .मिनरल वॉटर उपाध्यक्ष निवृत्ती सोनबा हरगुडे,उद्योजक संदीप विश्वनाथ भुजबळ ,गणेश बबन दरेकर ,सुनील भगवंत हरगुडे ,अमित पंडित आप्पा दरेकर , राजेंद्र साहेबराव हरगुडे यांच्यातर्फे होते .पालखी मिरवणुकीसाठी झांजपथक माजी चेअरमन किसन दतोबा हरगुडे व संचालक दिगंबर दत्तोबा हरगुडे यांच्यातर्फे होते .बँड झांज सौजन्य संतोष विष्णू दरेकर साई वेदांत डेव्हलपर्स व संतोष शिवले यांच्यातर्फे होते .ढोल ताशा सौजन्य सप्ताह मंडळाचे अध्यक्ष काळूराम नारायण हरगुडे , पोस्टमन पप्पू शहाजी दरेकर यांचे होते .आळंदी महाराज सौजन्य ग्रामपंचायत सदस्य रामदासनाना दरेकर व दगडूनाना दरेकर यांचे होते . आचारी उद्योजक सुनील भोसुरे यांच्यातर्फे ,बॅनर सौजन्य किरण बाळासाहेब भोसले यांच्यातर्फे होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच युवक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले . महाराजांचा सत्कार माजी सभापती आनंदराव हरगुडे , दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे, मा . उपसरपंच बाबासाहेब दरेकर मा . उपसरपंच नवनाथ हरगुडे ,शिवाजी राजे दरेकर , गोरक्ष भुजबळ , गोरक्ष दरेकर ,सुरज दरेकर , मोहन हरगुडे व ग्रामस्थांचे हस्ते करण्यात आला सुत्रसंचलन दता हरगुडे , सुरज दरेकर , विद्या धर दरेकर , गोरखनाना भुजबळ , सर्पमित्र बाळासो मोरे यांनी केले .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!