धर्मवीर शंभूराजे समाधीस्थळी भव्य रक्तदान महायज्ञ रेकॉर्ड ब्रेक- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
             धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
 समाधी स्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आज सार्वत्रिक मुंडन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी असंख्य शंभू भक्तांनी सहभाग घेतला होता,           
 धर्मवीर शंभूराजांना पकडल्यानंतर मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी 40 दिवस हाल हाल केले, शिक्षेचा प्रत्येक दिवस असह्य असताना शंभूराजे आणि कवी कलश यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, हेच ते 40 दिवस वढू बुद्रुक तुळापूर यांचे बरोबर राज्य तसेच हिंदुस्तान मध्ये बलिदान मास शिवभक्त व शंभू भक्तांच्या वतीने पाळण्यात येतो, आज सातवे पुष्प, आज सकाळी पवित्र अशा भीमा नदीतील तीरी सामूहिक मुंडन करण्यात आले,
त्यामध्ये असंख्य शंभूभक्तांनी सहभाग घेतला होता, दिवसभर शंभू भक्तांची रक्तदान करण्यासाठी समाधीस्थळावर रेलचेल होती, यावर्षी रेकॉर्ड ब्रेक रक्तदान झाले असून, सुमारे 2142 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले, रक्त संकलित करण्यासाठी पी एस आय पुणे  व अक्षय रक्तपेढी पुणे यांच्या प्रत्येकी 2 शाखा यांनी काम पाहिले, रक्तदात्यांसाठी अल्पोपआहाराची सोय करण्यात आली होती, महत्त्वाचे म्हणजे महिलांनी देखील रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला होता,सकाळी 9:00 वाजता सुरू झालेला रक्तादान शिबीर रात्री 10:15 वाजता संपले, शंभू भक्तांचा हा उत्साह पाहून पंचक्रोशीत कौतुक होत आहे, यावरून शंभू भक्तांचे शंभू प्रेम आपल्याला नक्की समजेल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने रक्तदात्यांना मोठी शंभू प्रतिमा, रक्तदान प्रमाणपत्र भेट म्हणून देण्यात आले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!