सणसवाडी - ज्ञानेश्वर मिडगुले
वारकरी संप्रदायाचे बाहेरचे आवरण हलके असले तरी आतील माल दर्जेदार असतो . काही दिखाऊ गोष्टींचे बाह्य पॅकिंग हे भारीतले चमकदार असते पण आतील माल सारखाच असतो म्हणून दिखाऊ गोष्टींना फसू नका , असे विचार सणसवाडी येथील अखंड हरीनाम सप्ताहातील काल्याचे किर्तनात मांडले .
विठ्ठल मंदिर प्रांगणात सणसवाडी ग्रामस्थांनी आयोजित सप्ताहात हभप नारायण शेळके (आळंदी ) , वैभव महाराज झेंडे (करंदी ) , माऊली पिंगळे (पाबळ), दिगंबर महाराज जाधव ( राहू ) , हभप पाबळ महाराज आळंदीकर , गजानन महाराज इंगवले , हभप प्रा .नवनाथ माशेरे ( आमदाबाद ) यांची किर्तनसेवा झाली . प्रवचन सेवा हभप कैलासअण्णा हरगुडे, राजेंद्र महाराज गरुड , उतरेश्वर पुर्भे, हभप कापरे महाराज, शिवचरीत्रकार राजेंद्र नरवडे , गोपाल महाराज समिंदर यांची झाली . दैनंदिन पहाटे ४ ते ६ काकडा भजन , सकाळी ७ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायं ५ ते ६ प्रवचन, सायं ६ते ७ प्रवचन व ९ ते ११ किर्तन व अखंड विणा सेवा असा कार्यक्रम झाला,
महाराजांचा सत्कार दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे, सप्ताह मंडळाचे अध्यक्ष सिताराम कांचन , काळुराम नारायण हरगुडे, उपाध्यक्ष तुकाराम दरेकर , निवृती सोनबा हरगुडे व सणसवाडी ग्रामस्थांनी केला .आळंदीकर भजनी मंडळ व वारकर्यांचा सन्मान माजी सरपंच बाबासो दरेकर , दता हरगुडे, वैभव यादव , आनंदराव हरगुडे , मोहन दरेकर, पो पाटील हिरामन दरेकर , विद्याधर दरेकर , पै देवराम दरेकर , काका सो गिरी , मोहन हरगुडे व ग्रामस्थांचे हस्ते करणेत आला .
पांडूरंग भजनी मंडळ व भैरवनाथ भजनी मंडळ व परिसरातील गावांचे भजनाचा रोज जागर झाला . काल्याचे महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली,