शिरूर प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी नागरीकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन कालांतराने कोठे ना कोठे वापरले जातात परंतु त्याचा शोध घेणेबाबत कुठलीही कार्यवाही होत नाही करीता ग्रामीणच्या सायबर पो स्टे च्या मदतीने अशा मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन्सला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी उपविभागिय पो. अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून त्यातील पो सब इन्स्पेक्टर एकनाथ पाटील, महीला पोलीस हवा. रेखा टोपे, पो.अंमलदार प्रवीण पिठले,पोलीस मित्र व तांत्रिक विश्लेषक दीपक बढे यांनी तांत्रीक विश्लेषणकरून २० मोबाईल फोन एकूण किंमत रु. ३२८०००/- शोधले व त्यातील रमेश खाडे,संभाजी जामदार,आत्माराम नढे,ओंकार शिंदे,सुनील इसोकार,दादासाहेब बेंद्रे,वैभव दसगुडे ,रामकृष्ण बिडगर, असे ७ लोकांना आज रोजी पो स्टे येथे बोलावुन ते त्यांना परत केले आहेत.
उर्वरित १३ मोबाईल देखील मुळ मालकांना परत केले जाणार आहेत. सर्वच्या सर्व फोन हे चालु व सुस्थितीत असल्याने मोबाइल धारकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदरच्या कामगिरीत पुणे ग्रा. सायबर पो. स्टे. चे पो. निरिक्षक प्रविण खानापुरे, पो. अंमलदार सचिन गायकवाड व सुनिल कोळी यांनी तांत्रिक माहीती पुरवुन मोलाचे सहकार्य केले आहे.