पत्रकाराला वाचवण्यासाठी परिचारिका, आमदार, पत्रकार आले देवासारखे धावून - लोक फोटो काढण्यात धुंद

Bharari News
1 minute read
0
सुनील भंडारे पाटील
              पुणे नगर महामार्गावर रात्रीच्या वेळी लोणीकंद (तालुका हवेली) येथे पावर हाऊस नजीक कोरेगाव भीमा येथील ज्येष्ठ पत्रकार के डी गव्हाणे यांचा अपघात झाला होता, एका परिचारिकेच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त पत्रकाराला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने वाचले प्राण, आमदार अशोक बापू पवार, पत्रकार शरद पाबळे, यांच्या प्रयत्नातून मिळाले पुढील वैद्यकीय उपचार,       
       संबंधित ठिकाणी रात्रीच्या वेळी पत्रकार के डी गव्हाणे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले, रस्त्यावरून येणारी जाणारे लोक मदत करण्याऐवजी त्यांचा फोटो काढण्यात व्यस्त होते, यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे आंदोलन आटपून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा व राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका मीनाक्षी शिंदे - मुदगल या शिक्रापूरला आपल्या घरी जात असताना हा अपघात त्यांच्या निदर्शनास आला, त्यांनी तातडीने गव्हाणे यांना मदत करण्यास सुरुवात केली, डोक्याला गंभीर जखम झाल्याने तसेच रक्तस्राव होत असल्याने त्यांनी डोक्याला कपडा गुंडाळून रक्तस्राव बंद करण्याचा प्रयत्न केला, व प्रथमोपचार केले, त्यानंतर 108 या हेल्पलाइन नंबर वर फोन करून पोलिसांची मदत मिळवली, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपघात ग्रस्त व्यक्तीचे ओळखपत्र तपासले असता, अपघात ग्रस्त व्यक्ती कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील असून ते ज्येष्ठ पत्रकार के डी भाऊ गव्हाणे असल्याचे निदर्शनास आले,
            त्यांना वाघोली येथील आयमॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्सच्या साह्याने तातडीने हलविण्यात आले, सहा-सात दिवसानंतरही त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर त्यांना शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता भाभी पवार यांच्या प्रयत्नातून पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये सवलती मधील उपचारासाठी हलवण्यात आले आहे, यासाठी आमदार पवार यांच्याशी पत्रकार पाबळे, यांनी संपर्क साधला,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 22, June 2025