पुणे शहरातील येरवडा (कल्याणी नगर) परिसरात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श या अलिशान गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडली होती. या मध्ये बड्या बिल्डर च्या पोराला 15 तासात जमीन मंजूर करण्यात आला...खरंच कायदा सर्वांना समान आहे का?
घडलेला प्रकार असा की....
पुण्यातील कल्याणी नगरमध्ये दारू पिऊन मध्यरात्री भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवून दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना चिरडणाऱ्या अल्पवयीन वेदांत विशाल अग्रवालला अवघ्या काही तासांमध्ये जामिन मिळाल्याने पुण्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. धडकेनंतर दुचाकीस्वार अनेक मीटरपर्यंत फरफटत गेला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही आयटी अभियंते मध्य प्रदेशातील असून ते सध्या पुण्यात राहत होते.
पुणे पोलिसांची लक्तरे पुन्हा एकदा या घटनेंतर वेशीवर टांगली गेली आहेत. बिल्डर पुत्राला ज्या पद्धतीने जामीन मिळाला आणि यावर कहर म्हणजे जी शिक्षा मिळाली आहे..ती खूपच हास्यास्पद आहे..आणि डोक्याला तीव्र वेदना देणारी आहे....
वृत्तानुसार, आरोपीच्या वकिलाने सांगितले की, त्याच्या जामिनावर पुनर्वसन आणि जागरुकतेच्या अटी आहेत. मंडळाने 17 वर्षीय मुलाला येरवड्यातील वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम करण्यास, अपघातावर निबंध लिहिण्यास, मद्यपान सोडण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्यास आणि मानसिक समुपदेशन घेण्यास सांगितले आहे.
इतका गंभीर गुन्हा केल्यानंतरही अशा प्रकराच्या अटी टाकून जामीन दिल्याने पुणेकरांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच म्रुत्यु झालेला आहे. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हाँस्पीटलमध्ये नेले, परंतु हाँस्पीटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही म्रुत्यु झाला.
आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स Bailable असल्यामुळे वेदांत चा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.