भोर प्रतिनिधी सुनिल साळवी
भोर तालुक्यातील शिंदेवाडी- भोर रस्त्यावरील उत्रोवली जवळ रस्त्याच्या कडेला असणारे जुने वडाचे झाड रस्त्यावरती उन्मळून पडल्याने भोर कडे जाणारा रस्ता बंद झाला आहे सदरील घटना दि.१३ रोजी पहाटे झाल्याने कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही.
सदरील रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे भोर परीसरातील कामगार वर्गाला शिरवळ एमआयडीसी मध्ये कामाला जाण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी संभंदित विभागाने ते उन्मळून पडलेले झाड बाजूला करून रस्ता खुला करण्यात यावा.
तसेच त्या रस्त्यावरील बरीचशी झाडे ही खुप जुनी झालेली आसून ती झाडे सभंदीत प्रशासनाने वेळीच पाडावी अन्यथा भविष्यकाळात मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, तरी या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी आता भोर परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.