सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शिक्रापूर ते वाघोली पर्यंत जवळपास साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून रस्ता रुंदीकरण करण्यात आले होते, काही दिवस गेले नाही ते एका खाजगी कंपनीने विद्युत केबल टाकण्यासाठी सणसवाडी (तालुका शिरूर) परिसरामध्ये पुणे नगर महामार्गाच्या साईट पट्ट्याची अक्षरशा चाळण केली आहे ,
विशेष म्हणजे भर पावसाळ्यात हे काम केल्याने साईड पट्टी वरती जागोजागी मोठे खड्डे पडले आहे यामध्ये काही ठिकाणी वाहने अडकून पडत आहेत मात्र या सर्व गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहे एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याचे काम केलेल्या असताना मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे साईड पट्ट्यांची चाळण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी साईट पट्ट्यांबरोबर डांबरीकरण देखील मोजण्याचे दिसून येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग काय कारवाई करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,
सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे राहुल कदम यांनी सांगितले की संबंधित चाललेल्या खोदकामाची पाहणी केली असून रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे झालेले नुकसान संबंधित कंपन्याकडून साईड पट्ट्या पूर्वीप्रमाणे करून घेणार असून कामामध्ये नुकसान झाल्यास संबंधित कंपन्यांच्या डिपॉझिट मधून रक्कम वजा केली जाईल,