एकाच विभागात अधिकारी ठाण मांडून बसल्याने पुणे शहरात पूर परिस्थिती

Bharari News
0
एकाच विभागात अधिकारी ठाण मांडून बसल्याने शहरात पूर परिस्थिती स्वराज्य पक्षाने महानगरपालिका आयुक्तांकडे केली चौकशीची मागणी

सुनील भंडारे पाटील 
                पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारन, देखभाल दुरुस्ती विभागामध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होत आहे.
 कार्यकाळ संपलेला असताना पुन्हा त्याच त्याच ठिकाणी कोणाच्या राजकीय आशीर्वादामुळे हे अधिकारी मागील दहा-बारा वर्षापासून ठाण मांडून बसले आहेत याचे गौडबंगाल काय याची चौकशी व्हावी अशी मागणी पुणे मनपा आयुक्तांकडे स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव यांनी केली आहे. 

यावेळी आयुक्तांनी चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश सामान्य प्रशासनाच्या उपायुक्तांना दिले आहेत.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे की, अधिकारी विनायक शिंदे हे सन २०१६ पासून मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती या विभागांमध्ये उप अभियंता या पदावर कार्यरत आहेत. एक-दोन महिन्यांसाठी विनायक शिंदे यांची बदली ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय, पाणी पुरवठा विभागात झालेली होती 

एवढा कार्यकाळ वगळता मागील दहा वर्षापासून शिंदे हे मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातच कार्यरत आहेत. दहा वर्ष अधिक काळ मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागात काम करूनही त्यांची बदली होणे अपेक्षित होते. 

मात्र नुकतीच महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाने बदलीसाठी पात्र असलेल्या उप अभियंता यांच्या यादीमध्ये विनायक शिंदे, पुरम यांचे नाव नाही याबद्दल संपूर्ण पुणे महापालिकेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

गणेश पुरम मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होते. ते त्याच ठिकाणी बढतीने शाखा अभियंता, उप अभियंता पदा पर्यंत बढती मिळूनही मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातच कार्यरत आहेत.

पूर्व भागात थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र विविध मिडियाद्वारे पहात असतो. या सर्व परिस्थितीस ठाण मांडून बसलेले अधिकारी शिंदे व पुरम हे प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे जाधव यांनी आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे. 

महापालिकेच्या मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागाकडून मागील दहा वर्षांमध्ये ड्रेनेज विषयक पावसाळी लाईन, कल्व्हर्ट विषयक किंवा नाला विषयक जे मोठे मोठे प्रकल्प झालेले आहेत, 

त्या प्रकल्पावर उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता म्हणून विनायक शिंदे व गणेश पुरम यांनीच काम पाहिलेले आहे. पुणे शहर वासियांना थोडा जरी पाऊस झाल्यास रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येते.त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय त्यास देखील हे अधिकारी जबाबदार आहेत. 

दोघेही मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून व राजकीय वरदहस्ताचा वापर करून मागील दहा वर्षांपासून याच विभागामध्ये कार्यरत आहेत.

 यांच्याकडे कोणाचे लक्ष कसे जात नाही? इतकी वर्षे होऊनही यांची बदली कशी होत नाही? असे प्रश्न उपस्थित करून मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागात इतके वर्षे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

धनंजय जाधव यांनी याबाबतचे निवेदन आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले आहे. आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांना दिले आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पूजा जाधव-मोरे, गणेश सोनवणे यासह स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!