नवीन पिढी फार हुशार आहे ... मिडगुले

Bharari News
0

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले

       नवीन पिढी फार  हुशार आहे . पण जे चांगले ते त्यांचेपर्यंत पोचत नाही . पण नको तो डीजेचा आवाज , आर्केस्ट्राची गाणी त्यांचे कानावर आदळतात , आणी त्यायोगे मुले वाहावत जातात , म्हणून नवपिढीपर्यत चांगले संतविचार अभंग पोचविणे गरजेचे वाटते म्हणुन शाळा कॉलेजांनी फिरून तासभर व्याखानाद्वारे मोफत प्रबोधन करतो , असे हभप पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांचे मानस आहे.

 आदर्श विद्यालय वरुडे , जि.प शाळा वरुडे, बुरुंज वाडी ,धारीवाल हायस्कूल गणेगाव या चार शाळांमध्ये व्याखानाद्वारे मुलांचे प्रबोधन केल्याकारणे आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी, गणेगावचे हायस्कुलचे मुख्याध्यापक भोर, जि प शाळेचे धुमाळ , विकास खैरे सर यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार केला . वरूडे हायस्कुलचे मुख्याध्यापक चौधरी यांनी श्रीफळा बरोबर पैशाचे पाकीटही मानधन म्हणून दिले ' पण ते पाकीट मिडगुले यांनी अभंग पाट असलेल्या  विद्यार्थ्यास दिले, कारणे मिडगुले हे प्रबोधन हे पैशांसाठी करत नसून मुलांना अभंगाची गोडी निर्माण व्हावी , सद्विचार रुजावेत , अभ्यास करून मोठे होण्याची महत्वाकांक्षा त्यांचेत तयार व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेत . सातशे वर्षा आधीचे ' अवघाची संसार ' ' इवलेसे रोप ' ' हरी मुखे म्हणा ' गोड तुझे रूप ' सारेच अभंग आजही ताजे गोड वाटतात , पण ते मुलांपर्यत पोचत नाहीत, पण फारतर सालकरच वाजणारे 'शांताबाई - बाबुराव - आवाज वाढव डीजे ' हे मात्र दणक्यात आदळतात , व मुले बहकतात . म्हणून चिरकाल टिकणारे संत साहीत्य हे अभंग, ओवी, गौळण , भारूडाद्वारे त्यांचेसमोर मांडणेचा प्रयास आहे, बदल होईल 'असा मिडगुले यांचा आशावाद आहे .- आदर्श विद्यालय वरुडे येथील मुख्याध्यापक चौधरी यांनी दिलेले श्रीफळ व मानधनाचे पाकीट अभंग  येणाऱ्या  विद्यार्थ्यांस देणेत आले,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!