जाब मागण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला ससूनमध्ये माहीती अधिकाऱ्याकडुन बेदम मारहाण

Bharari News
0

 

हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

           सहाय्यक प्राध्यापक हृदयशस्त्रक्रिया विभाग या  पदासाठी काही महिन्यांपूर्वी ससून रुग्णालय पुणे येथे डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे यांनी मुलाखत दिली होती त्याबाबत चौकशी व जाब मागण्यासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे हे ससूनमध्ये अधिष्ठता कार्यालयातील प्रथम अपीलीय सुनावणीसाठी गेले असता त्यांना तेथे उर्मट वागणूक देऊन तेथील मुख्य प्रशासकीय आणि जन्  माहिती अधिकारी  गणेश बडदरे यांनी शिवीगाळ करून डॉक्टर बोराडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली 
         

आणि पुन्हा ससून मध्ये  दिसल्यास पाय तोडण्यात येतील अशी धमकी देण्यात आली आहे मारहाण झालेले डॉक्टर बोराडे हे ससून रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या जीवाला इथून पुढील काळात धोका निर्माण झाला आहे तरी सदर मारहाण करणाऱ्या व्यक्तीस निलंबित करून पुढील सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा डॉक्टर बोराडे यांनी शासनाला दिला आहे. तरी डॉक्टर बोराडे  यांना योग्य तो न्याय मिळावा आणि अधिकारी गणेश बडदरे यांना निलंबित करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा स्वाभिमान ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉंग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!