सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील कल्याणी फोर्ज कंपनी मध्ये एक कामगार काम करत असताना क्रेन वरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, आकाश भुजबळ असे कामगाराचे नाव असून, शिक्रापूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,
संबंधित कामगार काम करत असताना कंपनीतील काही मटेरियल व साहित्य क्रेनच्या साह्याने उचलून बाजूला ठेवण्याचे काम करण्यासाठी दुपारी आकाश एकटा क्रेन ऑपरेटर करण्यासाठी गेला असता तो अचानक क्रेन वरून खाली पडला त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने सणसवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असता आकाश अतुल भुजबळ (25 वर्ष ) याच उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले या घटनेसंदर्भात देवराव भोसले यांनी पोलीस स्टेशनला कळविले त्यानुसार शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड करत आहेत,