मिडगुले यांचे शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन

Bharari News
1 minute read
0
  सणसवाडी : ज्ञानेश्वर मिडगुले
           आजकाल जो माणूस पायाने चालतो , तो ठरावीक अंतर गाठतो . पण जो कुणी डोक्याने चालतो , तो निश्चीतच ध्येय गाठतो . निट सरळ अभ्यासात डोके चालवूनच जिद्द चिकाटी व संस्कारांच्या बळावरच गरीब घरातील मुलगा मोठा व चांगला माणूस बनू शकतो , असा विश्वास हिवरे कुंभार , वढू बु ॥पुनर्वसन , पिंपळे जगताप येथील जिल्हा परीषद प्रशालांमध्ये उपस्थीत छात्रांसमोर केले . हिवरेचे मुख्याधापक श्री . पंचरास व वढू प्रशालेतील विद्यार्थ्यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प देवून केलेल्या प्रबोधनानंतर सत्कार करणेत आला .
            

नवीन पिढी मुले फार हुशार आहेत , पण जे चांगले ते त्यांचेपर्यत पोचत नाही , पोचले तरी त्यांचे मनात ठसत नाही , पण जे नको तो डीजेचा धमाका त्यांचे कानी आदळतो आणी ती नाचत सुटतात व बिघडतात . फक्त एकच वर्ष वाजणारे ते ' शांताबाई - बाबुराव ' सारखी वात्रट गाणी त्यांच्या कानी पडतात . पण ज्ञानदेव नामदेव तुकाराम मुक्ताबाई , जनाबाई या संताचे अनमोल अभंग त्यांचे कानी पोचत नाही , म्हणून संस्काराचा अभाव जाणवतो . तो संस्कार नवपिढीत रुजविण्यासाठी व्याखानाद्वारे गावोगावचे शाळा कॉलेजात जावून प्रबोधन करणे या उद्देशाने मिडगुले हे गेली दहा वर्षापासून प्रयत्नरत आहेत . स्वतः अनेक विद्यालयांत जावून आजपावेतो ६०० वर शाळांनी प्रबोधन केले असून दिवसाला ३ शाळा प्रमाणे त्यांचे काम चालू आहे . इच्छूक शाळा कॉलेज चे शिक्षक वा संस्थाचालकांनी मोफत व्याखानासाठी ७७७४ ०१ ८ ६५५ / ५ ८ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करणेत येत आहे .ज्ञानेश्वर मिडगुले हिवरे कुंभार व वढु बु ॥ प्रशालेत मुख्याध्यापक श्री पंचरास व छात्रांचे हस्ते सत्कार करतांना

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 23, June 2025