जातेगाव बुद्रुक येथील महाविद्यालयाचे नामकरण जिजामाता महाविद्यालय

Bharari News
0

शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला

         जातेगाव बुद्रुक येथील गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानच्या महाविद्यालयाचे नामकरण जिजामाता वरीष्ठ महाविद्यालय असे करण्यात आले असून नामफलकाचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.        
जातेगाव बुद्रुक येथील जिजामाता महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना संस्थेचे सचिव प्रकाश पवार.(छाया : नमीरा डिजीटल) 
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ बीबीए, बीसीए, बीएस्सी, बीकॉम हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २००८-२००९ पासून सुरू आहे. सदर महाविद्यालयाचे नाव बदलण्याचा संस्थेने धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर व त्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाची रीतसर परवानगी घेतल्यानंतर या महाविद्यालयाला जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय असे नाव देण्यात आले आहे. संस्थेचे सचिव प्रकाश पवार यांच्या हस्ते नुकतेच या महाविद्यालयाच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललीतकुमार इंगवले, कनिष्ठ महाविद्यालययाचे प्राचार्य रामदास थिटे, समन्वयक गजानन पाठक, कार्यालयीन अधीक्षक आनंदा अंकुश, प्रा.डॉ.विजय गायकवाड, प्रा. प्रीती पवार, प्रा. पूजा काटे, प्रा. सिमा बांगर, प्रा. सोनाली आव्हाळे, प्रा. रोहिणी जऱ्हाड, प्रा. मेधा गरुड, प्रा. अश्विनी खेडकर, प्रा. अमोल धापटे आदी उपस्थित होते. 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!