शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
कासारी येथील सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासन प्रात्यक्षिके सादर केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.
कासारी (ता.शिरूर) येथे भुजबळ विद्यालयाच्या प्रांगणात योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवाजी पाखरे व प्रा.म्हेत्रे यांनी मानवी जीवनातील योगाचे महत्व व आरोग्याच्या दृष्टीने प्राणायाम चे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजाराम साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी प्राणायाम, भुजंगासन, वृक्षासन, पादहस्तासन, वक्रासन, पद्मासन, शवासन, मकरासन, उष्ट्रासन, त्रिकोणासन आदी आसनांचे प्रात्यक्षिक केले. यावेळी नसीमा काझी, अरूण भुजबळ, रावसाहेब थोरात, ज्योत्स्ना दरेकर, विशाल सोनवणे, अर्चना तेमगिरे, दिलीप बांबळे, प्रमिला मोहिते, प्रा.विजय पाचर्णे, प्रा.अजिंक्य कडलग, प्रा. शीतल धेंडे, प्रा. विजय चव्हाण, प्रा. नजमा मकानदार, प्रा.सागर वाणी, प्रा.गौरव वाणी, प्रा.चव्हाण मॅडम, प्रा. कुंभार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.