योगशास्त्र हे व्यायाम नव्हे तर एक जीवनशैली : मारुती कदम

Bharari News
0

शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला         

           भारताने संपूर्ण जगाला योगशास्त्राची देणगी दिली म्हणूनच २१ जून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे जगातील सर्वच राष्ट्रानी ठरविले. योग आजार पळवतो, शरीर निरोगी ठेवतो, ऊर्जा वाढवतो आणि जीवन आनंदी बनवतो त्यामुळे योगशास्त्र हे व्यायाम नव्हे तर एक जीवनशैली आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम यांनी केले.     
                           भांबर्डे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योगासने करताना विद्यार्थी.(छाया : नमीरा डिजीटल)
भांबर्डे (ता.शिरूर) येथे न्यू इंग्लिश स्कूल आणि ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात कदम बोलत होते. यावेळी योग शिक्षक उत्तम गाडे यांनी उत्कृष्ट पद्धतीने योगाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घेतले. योगाचे प्रात्यक्षिक झाल्यानंतर लोहयुक्त चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटली. तसेच विद्यार्थ्यांच्या वजन व उंचीच्या नोंदी घेऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी ब्रिटानियाचे जिल्हा समन्वयक देविदास शेळके, निखिल वीर, अपर्णा ताटे, पूजा खंबायत, दिपाली गवारी, मनीषा प्रधान, किरण गव्हाणे, तेजस्विनी मस्के, बाळासाहेब दिवेकर ,नानाभाऊ  थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मारुती कदम यांनी केले.  सुरेश शेळके यांनी सूत्रसंचालन केले तर सविता शिंदे यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!