शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील जुन्या पुलाशेजारील वेताळ बुवा मैदान विद्याधाम
प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने खुले करण्यात आले
आहे.
शिक्रापूर येथील वेताळ बुवा मैदान विद्यार्थ्यांसाठी खुले करताना शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे व उपस्थित मान्यवर.(छाया : नमीरा डिजीटल)
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वेताळ
बुवा मैदान हे विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आल्याने विद्यार्थी व
पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयाचा आरओ फिल्टर प्लॅन्ट कित्येक दिवस
बंद होता, तो देखील ग्रामपंचायतीने सुरू केला आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची ही सोय झाली आहे. यावेळी
शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य
विशाल खरपुडे, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक
भुजबळ, विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाकडे व आपल्या आरोग्याकडे लक्ष
देणे आवश्यक असल्याचे याप्रसंगी बोलताना सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मांढरे यांनी केले तर कुंभार सर यांनी आभार
मानले.