सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
संत निळोबाराय पाळखी सोहळ्याचे मोठ्या दिमाखात पंढरपुरकडे
प्रस्थान झाले . शासकीय महापुजा जिल्हाधीकारी राजेंद्र भोसले , पोलिस
अधिक्षक मनोज पाटील , प्रांत सुधाकर भोसले, पी आय . घनाशाम बळप, पारनेरचेतहसिलदार
आवळकंठे व मान्यवरांचे हस्ते करणेत आली .
यावेळी जि .प . सदस्या राणीताई
लंके , सरपंच सुभाष गाजरे, संस्थानचे अध्यक्ष माऊली पठारे , पप्पु लटांबळे ,
भाऊसो लटांबळे , निलेश लटांबळे दिंडी प्रमुख अशोक सावंत पालखी सोहळा
प्रमुख गोपाळ मकाशीर व पिंपळनेर ग्रामस्थांचे हस्ते
मान्यवरांचा सत्कार करणेत आला . दुपारी हभप डॉ . विकासानंद मिसाळ यांचे '
पंढरीचा वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ' या अभंगावर किर्तन झाले .
निळोबारायाचे रथाचा मान मिळालेल्या चिंचोलीचे म्हाळसाकांत दिंडीचे बैलजोडी
ची मिरवणुक काढून रथास जोडणेत आले . निळोबा रायाचे दिंडीत पुणेवाडी -
नाथनगर ( पारनेर ) सिद्धेश्वरवाडी , पिंपळनेर , चिंचोली मोराची , जांबुत,
रावडेवाडी , विठ्ठळवाडी , आमदाबाद, चासकरवाडी , सावरगाव , गाडीलगाव .,निघोज
' शिनगरराडी , टाकळी ढोकेश्वर , गुणवरे , टाकळी ; निघोज आदी पारनेर ,
श्रीगोंदा, शिरूर तालुक्यातील ६१ दिंड्याची नोंदणी झाली होती, ज्ञानोबा -
तुकोबाराय , निवृतीनाथ , एकनाथ , गजानन , मुक्ताई, सोपान देवाच्या दिंडी
नंतर ९ व्या क्रंमाकाचा मान या निळोबारायांच्या दिंडीस मिळाल्याचे दिंडी
प्रमुख अशोक सावंत यानी सांगीतले . जिल्हाधीकारी राजेंद्र भोसले ' पो .
अधिक्षक अजित पाटील यांनी सहकार्याची भावना व्यक्त करत निळोबाराय देवस्थान
विकासासाठी सव्वा सहा कोटी देण्याचे सुतोवाच केले , कोरोना गेला असला तरी
काळजी घेण्याचे आवाहन केले . नगर न् पारनेर पोलीस विभागाने बंदोबस्त ठेवत
वाहतूक नियंत्रन केले .