श्री जोगेश्वरी प्रासादिक दिंडीचे भर पावसात पंढरपूरकडे प्रस्थान.

Bharari News
0

 हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

     भक्तिमय आणि हरिनामाच्या गजरात माऊली माऊली जयघोष करत केसनंद तालुका हवेली येथील श्री जोगेश्वरी प्रासादिक दिंडी चे आज दुपारी एक वाजता केसनंद येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले        
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या रथामागे दिंडी क्रमांक 58 मध्ये अखंडितपणे जोगेश्वरी प्रासादिक दिंडी वारीची परंपरा जप
ले
आहे दिंडीचे हे 28 वे वर्ष आहे. वैकुंठवासी वसंत काका आठवले व फकीर दादा बांगर यांनी 28 वर्षांपूर्वी दिंडीची सुरुवात केली होती त्याकाळी लावलेल्या या रोपट्याचे आज खऱ्या अर्थाने वटवृक्षामध्ये  रुपांतर झाले आहे. आज दिंडीचा लोणीकाळभोर या ठिकाणी मुक्काम असून उद्या सकाळी यवत तालुका दौंड येथे पालखी प्रस्थान ठेवणार आहे पालखीला निरोप देण्यासाठी केसनंद गावातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आबालवृद्धांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यामध्ये केसनंद ते थेऊर या टप्प्यामध्ये अनेक भाविक भक्तांकडून वारकऱ्यांना चहा पाणी व व फराळाचे उत्कृष्ट नियोजन व वाटप करण्यात आले,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!