शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासन प्रात्यक्षिके सादर केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे भुजबळ विद्यालयाच्या प्रांगणात योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यालयाचे क्रीडा शिक्षक किरण झुरंगे यांनी मानवी जीवनातील योगाचे महत्व व आरोग्याच्या दृष्टीने प्राणायाम चे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्राणायाम, भुजंगासन, वृक्षासन, पादहस्तासन, वक्रासन, पद्मासन, शवासन, मकरासन, उष्ट्रासन, त्रिकोणासन आदी आसनांचे प्रात्यक्षिक केले. यावेळी विद्यालयातील मिलिंद गायकवाड, गणेश मांढरे, गणेश मुंजावडे, मीनाक्षी चेडे, सुरेखा डोईफोडे, जयश्री कापरे, पुनम देव्हरकर, अर्चना चव्हाण, मेघा गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शालन रासकर व आदेश गारगोटे यांनी केले.