संभाजीराजे विद्यालयात सर्वांगसुंदर योगा संपन्न

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
         जातेगांव बुद्रुक येथील श्री संभाजीराजे विद्या संकुलाच्या प्रांगणात  ६५० विद्यार्थी सूर्यनमस्कार , कपालभारती , प्राणायाम , योगासने अगदी मंत्रमुग्ध वातावरणात साकारत योग दिन साजरा केला. 
       

         जातेगाव बुद्रुक येथील संभाजीराजे विद्यालयात योगासने करताना विद्यार्थी व शिक्षक वृंद.(छाया : नमीरा डिजीटल) 
जातेगांव बुद्रुक (ता.शिरूर) येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना  संभाजीराजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे म्हणाले की २१ जून वर्षभरातील सर्वात लांब दिवस असून मानवाचे दिर्घायुष्य दर्शविणारा आणि विद्यार्थी वयात आरोग्यमय जीवनाची गुरुकिल्ली ठरणारा हा सद्‌भावना दिवस आहे. योगा म्हणजे सर्व अवयवांचे सुरेल संगीत असल्याचेही  याप्रसंगी बोलताना थिटे यांनी सांगितले. सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत विद्यालयात विद्यार्थी - शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी जागतीक योगा दिना - निमित्ताने शांतता , प्रेम आणि आत्मीयतेचा अनुभव घेतला. सहज, सुंदर व सुलभ अशी योगाची प्रात्यक्षिके क्रीडा शिक्षक कांतीलाल धुमाळ, प्रमोद काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या करून दाखविली.
        पोटावरील व पाठीवरील आसने, मयुरासन, भुजंगासन, ताडासन, दिर्घ श्वास, अनुलोम - विलोम, सूर्यनमस्कार इ प्रात्याक्षिकांमुळे संपूर्ण विद्यार्थी विश्वात आरोग्यमय चैतन्य साकारले होते . पुढील वर्षभर नियमितपणे योगा करण्याचा संकल्प विद्यार्थी व शिक्षकांनी केला .कार्यक्रम यशस्वी करणेकामी प्रा. संतोष डफळ , विजय वरपे, रमेश जाधव, रोहीदास लवांडे, दशरथ आळवे, जालिंदर रणसिंग, गणेश बांगर, शंकर भुजबळ, प्रा. संगिता ढवळे, अनिता लंघे, प्रिया उमाप, सविता मांडवेकर, रेश्मा गहिने आदि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल संस्था अध्यक्ष सुगंधराव उमाप, सचिव प्रकाश पवार यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!