शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात प्लास्टिक संकलन उपक्रम राबविण्यात आला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या या प्लास्टिक संकलन उपक्रमात महाविद्यालयीन, कनिष्ठ महाविद्यालयीन व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा संकलित केला. त्यामध्ये विशेषता प्लॅस्टिक कागद, प्लास्टिक कॅरीबॅग, तुटले- फुटलेले प्लॅस्टिक साहित्य, प्लास्टिकच्या पाणी बॉटल तसेच वेस्टेज प्लास्टिक साहित्य जमा केले. त्याचबरोबर महाविद्यालयीन पॅरिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छताही केली.
जमा केलेला प्लास्टिक कचरा योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित विभागाला देण्यात आला. यावेळी संस्थेचे खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सीताराम अभंग, उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. योगेश पवार, डॉ. निता कांबळे, डॉ. एस.एस.राणे, डॉ.एम.एम.भोसले, डॉ. एस.पी.डाकले, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.संजय भोईटे, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे विभाग प्रमुख प्रा.अरुण शिंदे, प्रा.सुरेश मोरे, प्रा.एन.बी.मुल्ला, प्रा.हेमंत सावंत, प्रा.अनिल दाहोत्रे, प्रा.ए.एन.मदने, प्रा.भागवत पाटील, प्रा.राधिका इप्पकायल, प्रा. प्रिया आरडे, प्रा.श्रद्धा शिंदे, प्रा.जी.एस.बडनौरु, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम. जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.