विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याकडे लक्ष द्यावे : प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला 
           विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याकडे लक्ष द्यावे त्यासाठी नियमित व्यायाम व मैदानी खेळ खेळावेत असे आवाहन मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी केले.          
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे व संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सीताराम अभंग यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे बोलत होते. या शिबिरात महाविद्यालयीन, कनिष्ठ महाविद्यालयीन व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  यामध्ये हिमोग्लोबिन, डब्ल्यू.बी.सी., आर.बी.सी., जुनाट आजार, नाक, कान, घसा व श्वासासंबंधीचे आजार याविषयी तपासण्या व मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबिरातील सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. परशुराम सुर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एल.राठोड, प्रा. प्रिया आरडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.संजय भोईटे, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे विभाग प्रमुख प्रा.अरुण शिंदे, डॉ. योगेश पवार, प्रा.संतोष मोरे, डॉ. निता कांबळे, डॉ. पी.ए.हुंबाड, डॉ. एस.ए.इप्पलपली, डॉ. एस.पी.तितर, डॉ. तानाजी जाधव, प्रा.सुरेश मोरे, प्रा.एन.बी.मुल्ला, प्रा.हेमंत सावंत, प्रा.अनिल दाहोत्रे, प्रा.ए.एन.मदने, प्रा. मनिषा ठोंगिरे, प्रा.व्ही.ए.कदम, प्रा.ए.एस.पाटील, प्रा.राधिका इप्पकायल, प्रा.श्रद्धा शिंदे, प्रा.जी.एस.बडनौरु, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे, डी. बी. बेसके, सुरेखा वीर तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!