२७ गावांमधील हरकतींवर १९ जुलैपासून सुनावणी पीएमआरडीए

Bharari News
1 minute read
0


लोणी काळभोर अनिकेत मुळीक 
         पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यातील मावळ तालुक्‍यातील मळवली विकसन केंद्रातील १९ गावे तसेच ग्रामीण विकसन केंद्रातील आठ गावातील हरकतींवर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.           त्यानुसार या गावांमधील हरकतींवर १९ ते २६ जुलै या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही सुनावणी होणार आहे.  
     पीएमआरडीएने गेल्या वर्षी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. या आराखड्यावर ६० हजार हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १६४ गावांमधील २८ हजार हरकतींवर सुनावणी घेण्यात आली आहे. आता उर्वरित गावांमधील हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम सुरू आहे.,कुसगाव बु. – १९ जुलै, मळवली, कार्ला, डोंगरगाव, देवघर आणि वर्सोली – २० जुलै, औंढे खु, देवळे, भाजे, बोरज, पाटण, ओंढोली, मुंढावरे आणि पाथरगाव – २१ जुलै, पिंपळोली, कुणेनामा, ताजे, सदापूर आणि वाकसाई – २५ जुलै, कडूस (ता.,खेड), पौड, (ता.मुळशी), किकवी (ता.भोर), सांगरूण (ता.हवेली), राहु (ता.दौंड), पाबळ, न्हावरा (ता.शिरुर) – २६ जुलै

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 18, June 2025