सणसवाडी ज्ञानेश्वर मिरगुले
१५ -२० दिवसांची पायपीट करत वारकरी पंढरीला पोचतात , खरी भगवंत प्राप्ती वारकऱ्याच्या भावातच आहे, असे प्रतिपादन -मोहना नंद महाराज (पंढरपुरकर) यांनी केले
वारीनंतर श्री क्षेत्र पिंपळनेर येथे आयोजीत काल्याचे किर्तनात केले . यावेळी शिरूर , श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातून आलेल्या ३१ दिंड्यातील विणेकरी , तुळसी धारक महिला , व विशेषकरून सर्वात आदर्श शिस्तबद्ध ठरलेल्या व बैलजोडीचा मान असलेल्या चिंचोली मोराची येथील बैलांची देखभाल करणाऱ्या वारकऱ्यांचा खास सन्मान करणेत आला .
दिंडी प्रमुख हभप मकाशीर व अशोक सावंत यांनी सर्व वारकर्यांचे आभार मानले . पंढरपुरात पावसांमुळे वारकर्यांचे हाल झाले तरी हा दिंडीसोहळा यशस्वी करण्यासाठी वारकरी बंधू भगीनींनी सारे सहन केले, पुढे अधिक चांगले नियोजन करून निळोबारायांचा सोहळा डबल मोठा करूया असे आवाहनही अशोक सावंत यांनी केले . आलेल्या भाविकांना दात्यांनी महाप्रसाद दिलेकारणे त्यांचेही आभार मानले .