महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा .. रक्तदान हेच श्रेष्ठ दान ... आदर्श सरपंच दामुशेठ घोडे
शिरूर विशेष प्रतिनिधी
धर्मवीर चंद्रशेखर आण्णा बाणखेले यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखर आण्णा बाणखेले प्रतिष्ठान कडून आषाढी एकादशीच्या दिवशी टाकळी हाजी, मंचर, निरगुडसर, रांजणी ,कुरवंडी , चास ,निमगाव सावा ,जुन्नर पिंपरखेड या ठिकाणी महारक्तदान शिबीर संपन्न होत असून सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
टाकळी हाजी येथे हनुमान मंदिर एस टी स्टँड या ठिकाणी शांताई मेडिकल चे प्रोप्रायटर राहुल सोदक यांचे सौजन्याने शिबीर घेण्यात आले असून या शिबिरास नागरिकां कडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्यामुळे या उपक्रमात सहभाग नोंदवून एकादशीच्या पुण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी केले.