ड्रेनेजच्या गाळ मिश्रित ओला कचऱ्यामुळे परिसरात पसरली दुर्गंधी,
सुनिल भंडारे पाटील
वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथे वाघोली-राहू रस्त्यालगत डोंगरावरील उद्यान जवळ असलेल्या रिकाम्या जागे मध्ये अनधिकृत पणे कचरा टाकणाऱ्या चारचाकी टेम्पो कचरा गाडीवर ग्रामपंचायतीने २१ हजार रुपये दंडात्मक कारवाई करून कचरा टाकणाऱ्याला ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगली समज दिली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून बोल्हाई देवीचा नावलौकिक असून या परिसराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.अशा धार्मिक परिसरामध्ये रिकाम्या जागेत वाघोली येथील एका बिल्डर्स यांच्या मालकीच्या सोसायटीमधून सुनील जांभळकर यांनी टेम्पो वाहन एम.एच.१२, जी.टी.५५०७ यांनी त्यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनांमध्ये ड्रेनेजचा गाळ मिश्रित ओला कचरा उचलून आणून येथे या कचऱ्याचा टेम्पो खाली केला.
या परिसरामध्ये हा कचरा टाकत असताना ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित टेम्पो वाहन मालकाला पकडून त्याला कोणतीही सबब न देता २१ हजार रुपये दंड देण्यास भाग पाडले आहे.
यापुढील काळामध्ये आमच्या गावामध्ये रिकामी जागेत कचरा आणून टाकनाऱ्यांची असा गैरप्रकार करणाऱ्याची खैर केली जाणार नाही.असा इशारा वाडेबोल्हाईच्या सरपंच वैशाली केसवड,माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संदिप गावडे,
संत तुकाराम सोसायटीचे माजी चेअरमन निळकंठ केसवड,ग्रामपंचायत सदस्य गणेश भोरडे,पोलिस पाटील सुषमा चौधरी यांनी दिला आहे.यावेळी रामदास केसवड,किशोर गावडे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
बोल्हाई मातेचे पवित्र स्थान असलेल्या मंदिराच्या काही अंतरावरच व डोंगरावर असलेल्या उद्यान जवळच वाघोली येथून एका बिल्डर सोसायटी मधून असा दुर्गंधी युक्त कचरा टाकल्याने देवस्थान व उद्यानाचे पावित्र्य धोक्यात येत असून अशा अनधिकृतपणें कचरा व्यवस्थापन टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही यापुढे आमची ग्रामपंचायत दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर पोलिस तक्रारही दाखल करणार आहे.यासाठी यापुढे ग्रामपंचायत प्रशासन तत्पर राहणार आहे.
- संदिप उर्फ बापू गावडे,माजी उपसरपंच तथा सदस्य-ग्रामपंचायत वाडेबोल्हाई
वाहन माझे होते परंतु हा दुर्गंधी युक्त कचरा वाहन चालकाने सबंधित कंत्राटदाराच्या माध्यमातून वाघोली येथील एक बिल्डरच्या सोसायटीतून आणला असे वाहन चालकांकडून समजले मात्र हा कचरा वाडेबोल्हाई येथे मोकळ्या जागेत टाकल्याने आमच्यावर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई केली असून हा आणून टाकलेला कचरा आम्ही पुन्हा भरून नेहुन माझ्या बुर्केगाव येथील घराच्या मागे नेहुण टाकला आहे.
- सुनील झांभळकर,कचरा टेम्पो वाहन मालक