श्री छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल कोरेगाव भीमात 25 वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
                 कोरेगाव भिमा (तालुका शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी महाराज हायस्कूलच्या सन २०००-०१ च्या इयत्ता १० वी च्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन दि. १ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. २५ वर्षांनी पुन्हा भेट झाल्याचा आनंद आणि जुन्या आठवणींनी भरलेले क्षण, उपस्थित सर्वांच्या मनात आनंदाचे कारंजे उडवत होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीताने आणि दीपप्रज्वलनाने झाली. शिक्षकवर्गातील हरीश्चंद्र आवारे, एन.के.पोळके,.वर्षा वाजे, .वृषाली काळभोर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच मुख्याध्यापक अडुरकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने करण्यात आले.

या संमेलनात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी शेअर करत एकमेकांना आपल्या यशाच्या गोष्टी सांगितल्या. शाळेच्या विकासासाठी काही माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मनमोहक सादरीकरण केले. देशभक्तीपर गीते, नृत्य आणि भाषणांनी वातावरण भारावून गेले. 

कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजन आणि समूहछायाचित्रांच्या सत्राने झाली. सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षी असे संमेलन भरवण्याचा संकल्प केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यात शिक्षकवर्ग आणि माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य अतुलनीय ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा ढेरंगे व पवन कट्यारमल यांनी केले तर आभारप्रदर्शन विवेक ढेरंगे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सरपंच संदीप ढेरंगे, भाऊसाहेब गव्हाणे, राजश्री वाघमारे, मंजुषा भोकरे, स्वप्नील गव्हाणे, महेंद्र खांदवे यांनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!