हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
"गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः"
गुरुची महती गाण्याचा व गुरुप्रति लीन होण्याचा गुरु पौर्णिमेचा दिवस, सुंदरबाई मराठे विद्यालय प्राथमिक विभागामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जीवनातील पहिली गुरु म्हणजे माता. मातृऋण कधी फिटणार नाही. मातेचे पूजन करून तिच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यालयात मातृ पूजन घेण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मातेला मोठ्या आदराने बसवून पाद्यपूजन केले. आपल्या आईचे औक्षण केले, प्रार्थना म्हटली आशीर्वादही घेतला.

तसेच दररोज घराबाहेर पडताना आईला नमस्कार करून बाहेर पडू ,आईला नमस्कार करूनच शाळेत येऊ अशी प्रतिज्ञाही घेतली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डाळींबकर सर यांनी श्री गुरूंचे पूजन करून गुरुचे महात्म्य विद्यार्थ्यांना सांगितले.हेच गुरूंचे महात्म्य विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्यासाठी आरुणी व धौम्य ऋषींचा हृदय द्रावक प्रसंगही विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आला. धौम्य ऋषींच्या व शिष्यांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थी आले होते. प्रसंग पाहताना सर्व विद्यार्थी हरखून गेले होते. इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कल्पकता वापरून आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक भेटकार्ड बनवले होते. या भेटकार्डांचे प्रदर्शनही यावेळी मांडण्यात आले होते.

प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांच्या विविध प्रकारच्या गोष्टीही सांगितल्या. गुरु निस्वार्थपणे शिष्यांना ज्ञान देतात त्यांच्या प्रगतीसाठी धडपडतात कधी प्रेमळ वाणीने तर कधी कान धरून शिक्षण देऊन मोठे करतात .गुरुप्रती कायम कृतज्ञता भाव असायला हवा असे याप्रसंगी गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार रामभाऊ मोझे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे या प्रसंगी उपस्थित होते. तसेच शालेय समिती अध्यक्षा मा प्रा अलका पाटील तसेच इतर शिक्षक वृंदही याप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक डाळींबकर सर यांनी केले.