शिक्रापूर हिवरे रस्त्यावर खड्ड्यांची रांगोळी,रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता,सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष,

Bharari News
0

शिरूर प्रतिनिधी: विनायक साबळे 

         सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे शिक्रापूर(ता. शिरुर) येथील पाबळ चौकातून हिवरे भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली असून मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. येथील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघात सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.    
फोटो – शिक्रापूर ता. शिरुर येथील हिवरे रोड लगत रस्त्याची झालेली दुरावस्था व  खड्ड्यांची झालेली चाळण
शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक येथून हिवरे कुंभार, कान्हूर मेसाई, खैरे नगर, पिंपळे खालसा, खैरेवाडी, वाबळे वाडी यांसह आदी गावांना मिळणारा हा मुख्य रस्ता असून रस्त्यावर अगदी खड्ड्यांची रांगोळी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने लहान मोठी वाहणे आदळुन अपघात होत आहेत.
या रस्त्यालगत शाळा व महाविद्यालय असल्याने  येणाऱ्या व जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यालगत असलेल्या व्यवसायीक नागरीकांसह पादचारी नागरिकांना या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ 
रस्त्याच्या दुरूस्ती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या रस्त्याच्या कामाची जबाबदारी 
आमच्याकडे नसल्याचे सांगत रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ यांनी सांगितले
दरम्यान सदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे संगमेश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिटिंग सुरु असल्याचे कारण सांगत बोलणे टाळले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!