अनिकेत मुळीक लोणी काळभोर
पुणे शहरात मागील आठवड्या पासून संततधार पाऊस सुरू आहे. प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र,पुणे यांचं कडून मिळालेल्या माहितनुसार१४/०७/२०२२ व दि.१५/०७/२०२२
या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अतिवृषटीमुळे मुळे रेड अलर्टचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असलेले त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होऊ नये याकरीता पुणे जिल्ह्यातील (इंदापूर, बारामती,दौंड,शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून) इतर सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या (इंदापूर, बारामती,दौंड,शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून) इतर सर्व(प्री स्कुल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) सर्व शाळांना दिनांक १४/०७/२०२२ ते शनिवार , दिनांक १६/०७/२०२२ पर्यंत सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे.
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील संदर्भ क्र. २ नुसार, सदर परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक २ मधील शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन पुणे जिल्ह्यातील (इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून) इतर सर्व तालुक्यातील (प्री स्कुल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक)इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना गुरुवार, दिनांक १४/०७/२०२२ ते शनिवार , दिनांक १६/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करीत आहे. तथापि, सदर कालावधीमध्ये शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापण करणेचे आहे.
जिल्हाधिकारी
(डॉ. राजेश देशमुख)
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण पुणे