सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (जातेगाव फाटा) येथील भंगार दुकानदाराला लुटून त्याच्याकडील रोख रकमेसह ८७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवार (दि. १२ जुलै) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात नसीर अबुबकर खान (वय १९ वर्षे, रा. खालसा ढाब्याजवळ, जातेगाव फाटा, ता.शिरूर, जि.पुणे, मुळ रा.पचपेडावा, ता.तुलसीपुर, जि.बलरामपुर, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात सहा चोरट्यांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात सहा चोरट्यांनी शिक्रापुर (ता. शिरूर), जातेगाव फाटा येथील खालसा ढाब्याजवळील भंगार दुकानातुन रात्रीच्या सुमारास फिर्यादी नसीर खान याला त्यांचेकडील पांढरे रंगाची स्वीफ्ट गाडी मध्ये पाठीमागील सीटवर मध्ये बसवुन फिर्यादी खान याला हाताने मारहाण केली. गाडीचे चालकाचे सांगण्यावरून पाठीमागील एका इसमाने खान यांच्या खिशातील ५७ हजार रुपये रोकड व ३० हजार रुपये किमतीचा अँप्पल कंपनीचा आयफोन मोबाईल फोन असा ८७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला शिवाय चार लाखाची खंडणी मागितली व फिर्यादी खान यांना अज्ञात चोरट्यांनी ऐवज चोरल्यानंतर अनोळखी ठिकाणी सोडून निघुन गेले.
या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अशोक शेळके व पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने टीम तयार करून एपीआय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या काही तासातच फरार असणाऱ्या 6 आरोपींना अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले, शिक्रापूर पोलिसांच्या या कारवाईबद्दल परिसरातून कौतुक व्यक्त होत आहे,