कुणी अँबुलन्स देता का अंँबुलन्स

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
          कुणी अँबुलन्स देता का अंँबुलन्स असं म्हणायची वेळ रांजणगाव येथील ग्रामस्थांवर आली आहे .त्याला कारणही तसंच घडत आहे. अचानक घडलेला अपघात व एखाद्या माणसाला जर हृदयविकाराचा तीव्र झटका आला तर रांजणगाव येथे ॲम्बुलन्स साठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे.          
रांजणगाव गणपती येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे स्वतःची ॲम्बुलन्स आहे मात्र सदर ॲम्बुलन्स मिळवण्यासाठी किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. व  यात बराचसा वेळ वाया जातो तर दुसरी ॲम्बुलन्स रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरामध्ये आहे मात्र ही ॲम्बुलन्स बहुतांश वेळा रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात असते आणि कोणी मदतीसाठी जर मागितली ड्रायवर उपलब्ध नाही असे उत्तर दिले जात आहे.  त्यामुळे रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या ॲम्बुलन्स बाबतीतल्या विचित्र अनुभवाला रांजणगाव कर ग्रामस्थ वैतागले असून रुग्णांच्या सेवेसाठी ,  अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कुणी अँम्बुलन्स देता का अँम्बुलन्स असे म्हणायची वेळ रांजणगाव गणपतीकरां वरती आलेली आहे.              
याबाबत रांजणगाव गणपती ग्रामपंचायतचे सरपंच सर्जेराव खेडकर यांच्याशी संर्पक साधला असता रांजणगाव  ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगातून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी कोरोना काळात अँम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिली. माञ सदर वाहन आरोग्य विभागाच्या ताब्यात आहे.  या पुढे आवश्यकतेनुसार व ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावच्या सेवेसाठी अँब्युलन्स साठी ग्रामपंचायतच्या  वतीने वाहन चालक उपलब्ध करून दिला जाईल.असे रांजणगाव ग्रामपंचायत चे सरपंच सर्जेराव खेडकर यांनी सांगितले.तर अँम्ब्युलन्स उपलब्ध न झाले बाबत , देवस्थानच्या विश्वस्तांशी संर्पक साधला असता वाहनाच्या  तांञिक अडचणीमुळे अँम्ब्युलन्स देऊ शकलो नाही असे विश्वस्त विजयराज दरेकर यांनी सांगितले. या बाबत भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हर्षल जाधव यांनी सांगितले की , गोरक्ष शंकर भुजबळ रा. रांजणगाव गणपती  यांचा बुधवारी  सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास महागणपती मंदिरासमोरच अवजड वाहनाच्या धडकेत अपघात झाला होता. या बाबत जाधव यांनी देवस्थानच्या विश्वस्तांशी  संर्पक करुन अँम्ब्युलन्स मागितली असता कोणत्याही विश्वस्तांनी फोन उचलला नाही. तर व्यवस्थापकांशी संर्पक साधला असता अँम्ब्युलन्स पंक्चर असल्याचे सांगितले. 

              

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!