वाघाळे (तालुका शिरूर) येथे श्रीकृष्ण यात्रा महोत्सव अतिशय उत्सवात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यात्रेचे औचित्य साधून मंदिरात आकर्षक फुलांचे सजावट करण्यात आली होती.
याप्रसंगी यात्रे निमित्ताने मंगल अभिषेक , विडा अवसर विधि , भगवत गीता पारायण , दुपारी महा आरती , महा प्रसाद , हरी किर्तन , भव्य मिरवणूक , पालखी सोहळा व स्नेहभोजन आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सदर यात्रेचे प. पु.ति.शकुंतला ताई बाळापूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजन करण्यात आले होते.या यात्रा सोहळ्यात ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.